मालिनीच्या जळी डुले | Malinichya Jali Dule Lyrics in Marathi
मालिनीच्या जळी डुले पुढेमागे नाव
वल्हव नाव नाविका, घे भगवन् नांव
श्री भगवन्, जय भगवन्
दैव आपुले आज उजळले
भाग्यवंत चरणकमल आज पाहिले
पावन झाली नौका ही आज
डुलत जाय शांत नदजली
नेत्र लागले पैलतिरि दुरी
दूर राहिला माहेराचा गांव
दिनकर तळपे अंबरी निळ्या
मधुर रक्तिमा गालि उमटला
नयनि रमणिच्या स्वप्नयुक्त भाव