Bring It On Lyrics in Marathi – ब्रिंग इट ओन
अगं मनात माझ्या आली
साधी नितळ भावना
किती Alone राहू आता
चल Couple होउना
बघ तरी गोडीत..
लक्झरी गाडीत..
आलोया मै हूँ DON
बेबी ब्रिंग इट ओन
आलिंगनाला…(X4)
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला…(X4)
अगं आली तू गावात, बाराच्या भावात
गेलंय सारचं भान
अन कॉलेजात भेट झाली तुझी
मला भेटून वाटलं छान
वळखपाळख वाढली म्हनुन
लागली तुझीच गोडी..
अगं प्रपोज माझं तू अपोझ करून
कशी गं जमल जोडी
होतो म्या किडकिडा
हाडं बी काडीची..
गुटखा खावून वाट लागली बॉडी ची
येडयागबाळ्याला रानी
तुच प्रीत दावली
तुझ्यावानी रानी मला
एक नाही भावली..
फालतू पणा बी ग्येला
नवी रीत घावली
तुझ्या मागं मागं रानी
म्या बी जिम लावली
अन करतोय झुंबा
मी मारतुय बोंबा
न हालत झाली घान
अन करतोय झुंबा
मी मारतुय बोंबा
न हालत झाली घान!
बेबी ब्रिंग इट ओन
आलिंगनाला…(X4)
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला…(X4)
ATKT मधी झालोया पास
अन Daddy म्हणला बास
तरी तुझ्यामुळे आलोया
कालेजाला मला येगलाच ध्यास
शेजार गावाच्या आईच्या भावाच्या
लेकीचा झालाय क्लास
आणि येता जाता मला खाता-पिता
कसा होतोया तुझाच भास
करून खर्च लगीन लावू थाटात
आन तू तर साला हात देईना हातात
एकजीव झाल्यावानी राहू दोघ जोडीन
राहू दोघ जोडीन म्या दारू-बिरू सोडीन
पेमेंट झाल्या-झाल्या राणी दोन गुंठे काढीन
बँक लोन काढून म्या EMI फेडीन
घेऊन मिठीत साखर वाटीत
वाढायला मारली शान
बेबी ब्रिंग इट ओन
आलिंगनाला…(X4)
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला…(X4)
ब्रिंग इट ओन…..
आलिंगनाला
0watch?v=zYeJqzHVkkU