निंबोणीच्या झाडामागे – Nimbonichya Jhadamage Lyrics In Marathi
निंबोणीच्या झाडामागे
चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला
झोप का गं येत नाही
गाय झोपली गोठयात
घरटयात चिऊताई
परसात वेलीवर
झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या
गाते तुला मी अंगाई
देवकी नसे मी बाळा
भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी
केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता
जगावेगळी अंगाई
रित्या पाळण्याची दोरी
उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले
माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता
गाऊं कशी मी अंगाई
0watch?v=t_3bWHoFADc