Ashwin Shuddh Pakshi Amba Lyrics In Marathi

Ashwin Shuddh Pakshi Amba Lyrics In Marathi

अश्विन शुद्ध शुक्लपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी हो
मूलमंत्रजप करूनी भोंवते रक्षक ठेवूनी हो
ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।।
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरूनी हो
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळूनी हो

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो
पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो
कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो
अष्टभूजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो
उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतकरणी हो
पूर्णकृपें पहासी जगन्माते मनमोहिनी हो
भक्तांच्या माऊली सूर ते येती लोटांगणी हो

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो
अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो
आनंदे प्रेम तें आले सद्भावे क्रीडतां हो

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो
तेथे तूं नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडतां झेलुनि घेसी वरचेवरी

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

अष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी हो
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देऊनी सुखी केले अंतकरणी हो

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणें हो
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करूनी हो
षड्सअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणां तृप्त केलें कृपेकरूनी हो

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो
सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी हो
शुभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *