आईचा जोगवा – Aaicha Jogwa Lyrics in Marathi – Jogwa lyrics in marathi

आईचा जोगवा Aaicha Jogwa Lyrics – Jogwa lyrics in Marathi

आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन

अनादी निर्गुणी प्रगटली भवानी ।
मोह महिषासूर मर्दनालागूनी ।
विविध तपाची करावयाची झाडणी ।
भक्तालागी तू पावसी निर्वाणी ॥१॥

आईचा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारूनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन

नवविध भक्तीच्या करुन नवरात्रा ।
करूणा पोटी मागेन मी ज्ञानपुत्रा ।
धरीन सद्‍भाव अंतरीच्या मित्रा ।
दंभ सासर्‍या सांडीन कुपात्रा ॥३॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |

पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन मी कुर्वंडी ।
अद्‍भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |

आता साजनी झाले मी निसंग ।
विकल्प नवर्‍याचा सोडियला, संग ।
कामक्रोध हे झोडियले मांग ।
केला मोकळा मार्ग सुरुंग ॥५॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |

ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाऊनी नवस महाद्वारी फेडिला ।
एकपणे जनार्दन देखियला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |

0watch?v=IE7e0dysyYs

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *