Aaj Dise Ka Chandra Lyrics in Marathi

Aaj Dise Ka Chandra Lyrics in Marathi

आज दिसे का चंद्र गुलाबी?
हवेस येतो गंध शराबी
अष्टमीच्या या अर्ध्या राती
तुझी नि माझी फुलली प्रीती

अर्धे मिटले अर्धे उघडे
या नयनांतुन स्वप्‍न उलगडे
तळहातावर भाग्य उतरले
हात तुझा रे माझ्या हाती

स्वप्‍नी तुझ्या मी येता राणी
दुनिया झाली स्वप्‍नदेखणी
बघ दोघांचे घरकुल अपुले
निशिगंधाची बाग सभोती

अर्धी मिटली अर्धी उघडी
खिडकी मजसी दिसे तेवढी
अनुरागाच्या मंजुळ ताना
कर्णफुलासम कानी येती

या स्वप्‍नातच जीव भरावा
कैफ असा हा नित्य उरावा
अशीच व्हावी संगमरवरी
अर्धोन्मीलित अपुली नाती

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *