Aj Kalila Ek Phool Bhetale Lyrics in Marathi
आज कळीला एक फूल भेटले
हृदय चोरिले कुणी हृदय चोरिले
असा कसा लपुनछपून चोर घरी आला
अजाणतेपणी कसे न्याहाळिले त्याला
काही कळेना मला काय वाटले
बावरली आतुरली मोहरली प्रीती
पंख फुटे लहर उठे गीत जुळे ओठी
प्रणयसुखाचे मनी भाव साठले
घडोघडी मनोमनी भास नवे नवे
जवळ दिसे दूर असे तेच मला हवे
एक हरवले आज एक शोधिले