Amha Na Kale Dnyan Lyrics in Marathi
आह्मां नकळे ज्ञान न कळे पुराण
वेदाचें वचन नकळे आह्मां
आगमाची आढी निगमाचा भेद
शास्त्रांचा संवाद न कळे आह्मां
योग याग तप अष्टांग साधन
नकळेची दान व्रत तप
चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा
गाईन केशवा नाम तुझें
आह्मां नकळे ज्ञान न कळे पुराण
वेदाचें वचन नकळे आह्मां
आगमाची आढी निगमाचा भेद
शास्त्रांचा संवाद न कळे आह्मां
योग याग तप अष्टांग साधन
नकळेची दान व्रत तप
चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा
गाईन केशवा नाम तुझें