अन् हल्लगीच्या तालावर ढोल An Hallagichya Talavar Marathi Lyrics
अन् हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो हा
गजा नाचतो रं कसा गजा नाचतो हा
अवो सोंड फिरं गरारा अन् प्वाट वाजं नगारा
अवो लाडं लाडं मारतो कसा आबाळात फवारा
अन् ढगाच्या गा रूपानं ह्यो पानी पाजतो गा
अवं ठुमक ठुमक बशितो अन् नादामंदी उठीतो
आरं खेळाची ही नशा रं, कसं दोनी डोळं मिटितो
अन् इंद्राचा ऐरावत ह्येला लाजतो गा