Bai Bai Manmoracha Lyrics | बाई बाई मनमोराचा लिरिक्स
बाई बाई, मनमोराचा
कसा पिसारा फुलला
चिमनी मैना, चिमना रावा
चिमन्या अंगणी, चिमना चांदवा
चिमनी जोडी, चिमनी गोडी
चोच लाविते, चिमन्या चार्याला
चिमनं, चिमनं, घरटं बांधलं
चिमन्या मैनेला
शिलेदार घरधनी माझा,
थोर मला राजांचा राजा
भोळा भोळा जीव माझा
जडला त्याच्या पायाला
रे मनमोरा, रंगपिसारा,
अंगी रंगुनी जीव रंगला
गोजिरवाणी, मंजूळगाणी,
वाजविते बासुरी डाळिंब ओठाला
येडं, येडं, मन येडं झालं ऐकून गानाला