Chikana Chikana Mhavara Lyrics in Marathi | चिकना चिकना म्हावरा माझा
घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा
चिकना चिकना म्हावरा माझा
इस्वास ठेव रं सांगतंय् नक्की
याचे पुरती कोंबरी फिकी
अंगानं जोर येईल कामकाजा दादा कामकाजा
चिकना चिकना म्हावरा माझा
दिसतंस मेल्या बोंबलावनी
खाशील तर होशील भोपल्यावानी
ताकदीच्या दव्याचा ह्यो राजा दादा ह्यो राजा
चिकना चिकना म्हावरा माझा
तलूनशी खा जरा गरम गरम
मिटुनशी जाईल सगला भरम
वाजंल खुशीचा बेंडबाजा दादा बेंडबाजा
चिकना चिकना म्हावरा माझा
म्हवरा हाय माझा सोन्यावानी
बघतंस कला का कावल्यावानी
बोंबील वाकटी सुकट खा जा
चिकना चिकना म्हावरा माझा
बोलू नको नाई बरपाचा ह्यो
नीट बग नाई काल-परवाचा ह्यो
वासकलाशीतंस चल फुट जा
चिकना चिकना म्हावरा माझा