Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi
देहुडा चरण वाजवितो वेणु ।
गोपिकारमणु स्वामि माझा
देखिलागे माय यमुनेचें तीरीं ।
हात खांद्यावरी राधिकेच्या
गुंजावर्ण डोळे शिरीं बाबरझोटी ।
मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे
सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर ।
नामया दातार केशीराजा