दूर दूर – Dur Dur Lyrics in Marathi – मितवा 2015
पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे
उठला हा जाळ आतून करपल रान रे
उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान
डोळ्यातल्या पाण्याने हि भिजेना तहान
दूर दूर चालली आज माझी सावली
कशी सांज हि उरी गोठली
उरलो हरलो दुखः झाले सोबती
काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला
मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा
आपुलाच तो रस्ता जुना मी एकटा चालू किती
उरलो हरलो दुखः झाले सोबती
लाभतो सारा दिलासा कोणता केला गुन्हा
जिंकुनी हि खेळ सारा हारते मी का पुन्हा
त्रास लाखो भास लाखो कोणते मानू खरे
उरण्या त्या पावसाचे घाव मनावर का चढे
समजावतो मी या मना
तरी आसवे का वाहती
उरलो हरलो दुखः झाले सोबती
0JuIfN8F037E