Ek Limbu Jhelu lyrics – Bhondla Songs In Marathi Lyrics
Ek Limbu Jhelu lyrics in Marathi
एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू
दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू
पाच लिंबांचा पाणवठा , माळ घाली हणमंताला
हणमंताला निळी घोडी, येता जात कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागं होती राणी
अगं, अगं राणी इथं कुठं पाणी, पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू, तेथें खेळे चिलार बाळू
चिलार बाळाला भूक लागली , सोन्याचे शिपल्याने दूध पाजले
परटाच्या घडीने तोंड पुसले
निज रे निजरे चिलार बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले का नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली
शेण गोळा आंब्या खाली
शेण गोळा आंब्या खाली
पान सुपारी उद्या दुपारी
गौराईच्या माहेरी तांब्याच्या चुली
मांडव घातला मखमखपुरी
लगीन लागला सूर्या तळी
उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली
टाळ्या टाळ्या पुरणाच्या पोळ्या
भुलाई जाते सासऱ्या
भुलाई जाते सासऱ्या
जाईल तशी जाऊ द्या
खीर पुरी खाऊ द्या
भोंडला खेळायला येऊ द्या
जाईल तशी जाऊ द्या
खीर पुरी खाऊ द्या
भोंडला खेळायला येऊ द्या
01s9L8Ji7VSk