Gan Gan Ganat Bote Lyrics In Marathi
गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरुते
या श्रेष्ठ गजानन गुरूते तुम्ही आठवीत रहा याते
हे स्तोत्र नसे अमृत ते मंत्राची योग्यता याते
हे संजीवनी आहे नुसते व्यावहारिक अर्थ न याते
मंत्राची योग्यता कळते जो खराच मंत्रीक त्याते
या पाठे दु:ख ते हरते पाठका अती सुख होते
हा खचीत अनुग्रहा केला श्री गजनाने तुम्हाला
घ्या साधून अवघे याला मनी धरून भाव भक्तिला
कल्याण निरंतर होई दु:ख ते मुळी नच राही
असल्यास रोग तो जाई वासना सर्व पुरतील ही
आहे ह्याचा अनुभव आला म्हणूनिया कथित तुम्हाला
तुम्ही बसून क्षेत्र शेगावी स्तोत्राची प्रचीती पहावी
ही दन्त कथा ना लवही ह्या गजाननाची ग्वाही
ईति शम्