Ganapati Tu Gunapati Tu गणपती तू गुणपती तू
गणपती तू गुणपती तू नमन चरणी ईश्वरा
मी अडाणी भगत म्हणुनी दया करी या लेकरा
बोले तुणतुणं बोले हलगी
कडकड वाजे कडी ढोलकी
शाहीर कवनी जाई रमुनी, भरती जणू सूरसागरा
बहुजन मेळा थकला दमला
रसिक होउनी म्होरं जमला
कलाकृतीचा बागबगीचा, तरूतळी घेती आसरा
तू तर ठेवा सकल कलांचा
सुगंध तू तर शब्दफुलांचा
निराकार तू कलाकार मी, चुकभूल माझी सावरा