Hanuman Aarti Marathi Lyrics
मारुतीची आरती
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनिं ।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री हनुमंता ।
तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥
दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द ।
थरथरल्या धरणीवर मानिला खेद ।
कडकडिले पर्वत उड्डुगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ॥ २ ॥
जय देव जय देव जय श्री हनुमंता ।
तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता ।
जय देव जय देव ॥
0eR3DQHOHakI