He Gananayak Siddhi Lyrics in Marathi | हे गणनायक सिद्धीविनायक
हे गणनायक, सिद्धीविनायक
वंदन पहिले तुला गणेशा
रसीकजनांनी भरले अंगण
व्हावे मनाच्या त्यांच्या रंजन
लवकर यावे दर्शन द्यावे
घ्यावे जवळी एकच आशा
चाळ बोलती छुनछुन पायी
जणू अवतरली इंद्रसभा ही
गुणवंतांचा आश्रय मिळतो
कीर्तनरूपी असे तमाशा
मेळा जमला ताल-सूरांचा
रंग उधळला शिणगाराचा
दिनरातीला जागत राहो
जनसेवेतून अमुचा पेशा