He Savalya Ghana Lyrics in Marathi
हे सावळ्या घना
का छेडिसी मनाच्या अशा तारा पुन्हा पुन्हा
पानांतुनी या मोहुनी, गाणे जलाचे फुले
गाण्यातुनी त्या दाटुनी, झेले फुलांचे हासले
वारा हळू हा प्रीती-स्वरांनी झुलवी तृणा तृणा
थेंबापरी या नाचवी पक्षी स्मृतींचा तुरा
त्या आठवांनी भारले, माझ्या मनाच्या अंबरा
आता प्रियाची चाहूल ऐशी भुलवी कणाकणा