Ishwarachi Daya Kiti Lyrics in Marathi – ईश्वराची दया
ईश्वराची दया किती,
थांग तिचा लागेना
न्यायि तरी त्याची प्रीति,
सिंधुएवढी जाणा
देव बोले प्रेमे फार,
टाकी माझ्यावरी भार……. 3
1)
सर्व कष्टी, सर्व दुःखी,
ओझियांनी कण्हती
ऐकु जाते दिव्यलोकी,
प्रीति तेथे वसती
देव बोले प्रेमे फार
टाकी माझ्यावरी भार……… 3
2)
देवं खरा ममताळू,
अंत काही लागेना
केवढा तो कनवाळू,
माणसाना कळेना
ती खरी अगाध प्रीति,
ती तयाच्या अंतरी
तोच म्हणे, नाही भीती,
मी दयासनावारी
देव बोले प्रेमे फार,
टाकी माझ्यावरी भार…….. 3
3)
या उदासी भ्रांति सोडा,
त्याची वाणी ऐकुनी
निश्चला ती मैत्री जोडा,
पूर्ण भाव ठेवुनी
बापावरी टेकतांना,
लेकरना सुख फार
येशु पाशीं राहताना,
हर्ष वाटतो अपार
0watch?v=6LNTNWD0CIE