Jahle Bhajan Lyrics In Marathi

Jahle Bhajan Lyrics In Marathi

जाहलें भजन आम्ही नामितों तव चरणा, नामितों तव चरणा ||

वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना || धृ ||

दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो, देवा तुजलाची ध्यातो ||

प्रेमें करूनियां देवा गुण तुझें गातों || १ ||

तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना ||

रक्षूनियां सर्वा धावि आम्हांसी आज्ञा || २ ||

मागणें ते देवा आतां एकची आहे, आतां एकची आहे ||

तारूनियां सकळा आम्हां कृपाद्रष्टी पाहें || ३ ||

जेव्हां सर्व आम्ही मिळू ऐशा या ठाया, ऐशा या ठाया ||

प्रेमानन्दें लागू तुझी किर्ति गावया || ४ ||

सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी, आमुच्या मनी ||

हेची देवा तुम्हां असे नित्य विनवाणी || ५ ||

वारूनियां संकटे आतां आमुची सारी, आतां आमुची सारी ||

कृपेची साउली देवा दीनावरि करी || ६ ||

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी, चिंता तुम्हा असावी ||

सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावि || ७ ||

निरोप घेतो आतां आम्हा आज्ञा असावी |

चूकलें आमचें काही त्याची क्षमा असावी || जाहले |

More Song: Devichi Aarti Marathi Lyrics

#jhale bhajan lyrics

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *