Kali Umalate Mana Ekada Lyrics in Marathi
कळी उमलते मना एकदा
पुन्हा न सुख ते मिळे दहादा
लहर वायुची, शीत चंद्रकोर
ती लज्जांकित अबोल थरथर
दळदळ उधळी मुक्त सुगंधा
एक रात ती सौभाग्याची
आस पुरविते शतजन्मांची
मौन साधिते सुखसंवादा
असले जीवन अशी पर्वणी
निर्माल्याच्या कुठून जीवनी
जीवन अवघे हीच आपदा