Katyachya Anivar Vasali lyrics in Marathi Abhang| मी माझें मोहित राहिलें
Katyachya Anivar Vasale Lyrics in Marathi
कांट्याच्या अणिवर वसलि तिन गांव
दोन ओसाड, एक वसेचि ना
वसेचि ना तेथें आले तीन कुंभार ।
दोन थोटे, एका घडीच ना
घडीच ना त्यानें घडलीं तीन मडकीं ।
दोन कच्चीं, एक भाजेचि ना
भाजेचि ना त्यांत रांधले तीन मूग ।
दोन हिरवे, एक शिजेचि ना
शिजेचि ना तेथें आले तीन पाहुणे ।
दोन रुसले, एक जेवीच ना
जेवीच ना त्याला दिल्ह्या तीन म्हशी ।
दोन वांझ्या, एक फळेचि ना
फळेचि ना तिला झाले तीन टोणगे ।
दोन मेले, एक जगेचि ना
जगेचि ना त्याचे आले तीन रुपये ।
दोन खोटे, एक चालेचि ना
चालेचि ना तेथें आले तीन पारखी ।
दोन आंधळे, एका दिसेचि ना
दिसेचि ना त्याला दिल्या तीन बुक्क्या ।
दोन हुकल्या, एक लागेचि ना
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवांचोनि कळेचि ना
0ZIBHqpVfVq4