Krishna Udavu Nako Rang Lyrics in Marathi
कृष्णा, उडवू नको रंग थांब, थांब, थांब
सासुरवाशीण साधी भोळी, मी तर गौळण थोरा घरली
हिरवा शालू नवीन ल्याले डोईवर घागर भरली
तुझ्या मुरलीचे कौतुक करता, मी ठरते रे पापी पतिता
जल भरणाचे निमित्त काढुनी येते कुणा न कळता
भिजून जाता वस्त्र माधवा, बोल लावतील नणंद-जावा
मज वेडीला काही न त्याचे तुलाच फळतील देवा