श्री कृष्ण पाळणा Shri Krishna Paalana Pahilya Divashi
श्री कृष्ण पाळणा:
पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ
कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो……………..॥धृ॥
दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग
जसा झळकतो आरशाचा भिंग..॥२॥
तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठा
खारीक खोबरं साखर वाटा ……..॥३॥
चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेनं वाजविली टाळी
कृष्ण जन्मला यमुना तळी ……..॥४॥
krishnacha palna lyrics
पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा लिंबू नारळ देवीला फोडा
तान्ह्या बाळाची द्रुष्ट गं काढा………॥५॥
सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा
चला यशोदा आपुल्या घरा ……..॥६॥
सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल
यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोलं ..॥७॥
आठव्या दिवशी आठवीचा थाट भूलल्या गवळणी तीनशे साठ
श्री कृष्णाची पाहतात वाट ………॥८॥
नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्ह्या बाळाने घेतला छंद
वासुदेवाचा सोडवावा बंध ………॥९॥
दहाव्या दिवशी भाग्येची रात तेहतीस कोटी देव मिळूनी येती
उतरून टाकती माणिक मोती ….॥१०॥
अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले
मथुरा नगरीत देवकीचे हाल …..॥११॥
More Song: Gavlan Mathurela Nighali Lyrics
बाराव्या दिवशी बाराच नारी पाळना बांधिला यशोदा घरी
त्याला लावली रेशमी दोरी …….॥१२॥
तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी
गवळणी संगे लावितो खळी ….॥१३॥
चौदाव्या दिवशी तोफा गर्जती शंकर पार्वती नंदिवर येती
बाळाच्या डोळ्यात काजळ घालती ॥१४॥
पंधराव्या दिवशी नौबत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज
यशोदा मातेला आनंद आज …॥१५॥
सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला
श्रीकृष्णाचा पाळणा गायीला जो बाळा जो जो रे जो…..॥१६॥