Majhya Hati Manik Moti lyrics in Marathi
माझ्या हाती माणिकमोती घालिते उखाणा खणखणाणा
जसा मोतियाचा दाणा माझा हा उखाणा खणखणाणा
पाऊस नाही पाणी नाही रान कसे हिरवे?
कात नाही चुना नाही तोंड कसे रंगले?
खातो मोती पितो पाणी गातो हा दिवाणा, हा उखाणा
पोपट
बुरख्यावर बुरखे बत्तीस बुरखे
देवाचे लाडके डोईवर झळके
हिरव्या रानी खाली पाणी स्वरूप सुंदर जाणा, हा उखाणा
कमळ
एवढीशी आत्याबाई, राग तिला येई
तोंडाशी लागते, पाणी डोळ्या आणते
बांधा छोटा रुबाब मोठा घालिते धिंगाणा, हा उखाणा
मिरची