माज्या सारंगा राजा सारंगा | Majya Saranga Raja Lyrics in Marathi
माज्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं धाकल्या दीरा रं
चल जावया घरा !
आज पुनवा सुटलंय दमानं
दरियाच्या पान्याला आयलंय उदान
पिऊन तुफानवारा
शीड फाटलं धावतं पाठी
तुटलंय् सुकानू मोरली काठी
फेसाल पान्याचा घेरा
कोलीवारा रं राहिला दूर
डोलां लोटिला पान्याचा पूर
संबाल संसार सारा