Nam Techi Roop Lyrics in Marathi
नाम तेंचि रूप, रूप तेंचि नाम ।
नामारूप भिन्न नाहीं नाहीं
आकारला देव नामरूपा आला ।
ह्मणोनी स्थापिलें नामवेदीं
नामापरता मंत्र नाहीं हो आणिक ।
सांगती ते मूर्ख ज्ञानहीन
नामा ह्मणें नाम केशव केवळ ।
जाणती प्रेमळ भक्त भले