Namila Ganapati Lyrics in Marathi | नमिला गणपति
नमिला गणपति माउली सारजा ।
आतां गुरुराजा दंडवत ॥१॥
गुरुरायाचरणीं मस्तक ठेविले ।
आपुल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥
गुरुराया तुजऐसा नाहीं सखा ।
कृपा करोनी रंका धरीं हातीं ॥३॥
तुका म्हणे माता पिता गुरु बंधु ।
तूच कृपासिंधु गणराया ॥४॥