Nandadeep Ha Lavite lyrics in Marathi
नंदादीप हा लाविते श्रीहरी
जीवनातील कण कण उजळो आस ही अंतरी
चंदनापरी देह झिजावा
पुष्प होउनी सुगंध द्यावा
भाग्य कोणते दुजे याहुनी सांग ना श्रीहरी
क्षणभंगुर हे जीवन जगते
परि जगाला उजळून जाते
विद्युल्लतेचे तेज लाभू दे आस ही अंतरी