Natrang Ubha lyrics in Marathi – नटरंग उभा ललकारी नभा

Natrang Ubha lyrics in Marathi – नटरंग उभा ललकारी नभा

धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट
नटनागर नट हिमनट पर्वत उभा
उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग
पखवाज देत आवाज झनन झंकार
लेऊनी स्‍त्रीरूप भुलवी नटरंग

रसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला
साता जन्मांची देवा पुन्याई लागू दे आज पणाला
हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्‍नर ही तालाची
छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी
किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी

ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार
तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार
मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार
पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्‍नर ही तालाची
छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी
किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी

0watch?v=lQBKXT6BNG0

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *