Naval Vartale Ge Maye Lyrics in Marathi
नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु
हास्यचि विलसे ओठी, अद्भुतचे झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु
पहाटली आशानगरी, डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु
चैत वार्याची वाहणी, आली देहाचे अंगणी
अंग मोहरुनी आले जसा का पलाशु