Pandhariche Jan Avaghe Lyrics in Marathi
पंढरीचे जन अवघें पावन ।
ज्या जवळी निधान पांडुरंग
विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें ।
विठ्ठलनामें करणें सकळ काम
विठ्ठलनामीं गोडी धरोनी आवडी ।
विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें
नामा ह्मणे अवघें विठ्ठलचि झालें ।
विठ्ठलें दिधलें प्रेमसूख