Pappa Sanga Kunache lyrics in Marathi
पप्पा सांगा कुणाचे?
पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची
मम्मी माझ्या पप्पांची
इवल्या इवल्या घरट्यात
चिमणा चिमणी राहतात
चिमणा चिमणी अन् भवती
चिमणी पिल्लेही चिवचिवती
आभाळ पेलती पंखांवरी
पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा
पिलांचा हळूच पापा घ्यावा
पंखांशी पंख हे जुळताना
चोचीत चोच ही मिळताना
हासते नाचरे घर सारे
हासते छप्पर भिंती दारे