Parabramha Nishkam Lyrics in Marathi

Parabramha Nishkam Lyrics in Marathi

परब्रह्म निष्काम तो हा गौळियां घरीं ।
वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी

ह्मणती गौळणी हरीचीं पाउलें धरा ।
रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा

लपतछपत येतो हरी हा राजभुवनीं ।
नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं

सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं ।
शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी

बहुता पुण्यें बहुता कष्टें जोडलों देवा ।
अनंत पवाडे तुमचे न कळती मावा

नामा ह्मणे केशवा अहोजी तुह्मी दातारा ।
जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *