Payala Naman Ho Karito Lyrics in Marathi | पयलं नमन हो करितो वंदन
पयलं नमन हो करितो वंदन
पयलं नमन हो पयलं नमन
तुम्ही ऐका हो गुणिजन
आम्ही करितो कथन
पयलं नमन करुनी वंदन
इडा मांडून, इडा देवाला
इडा गावाला, इडा पाटलाला
आणि इडा मंडळिला
आम्ही सांगतो नमन
तुम्ही ऐका हो गुणिजन
पयलं नमन हो पयलं नमन
आम्ही सांगतो कथन
तुम्ही ऐका हो गुणिजन
विस्कटली हरा आम्ही येथ फुले
अज-गज-गौरीवर चवरी डुले
विस्कटली हरा आम्ही घेत फुले
लहान मुलंमुली जमून चिमुकाली
खेळ भातुकलीचा खेळताना नकली
अकलेच्या चिखलात नेत्र खुले
विस्कटली हरा आम्ही घेत फुले
गणपती आला अन् नाचुन गेला रं
गणपती आला अन् नाचुन गेला
नटवार पार मांग झाला रं
गणपती आला अन् नाचुन गेला
पयलं नमन हो करितो वंदन
पयलं नमन हो पयलं नमन