Pritichya Chand Rati Lyrics in Marathi
प्रीतीच्या चांदराती
घेऊनि हात हाती
जोडू अमोल नाती ये ना
ये प्रिये, ये प्रिये
फुलला हा कुंज सारा, हसली पाने फुले
रुसवा आता कशाला, अधरी प्रीती झुले
हासते चांदणे
सरला आता दुरावा, मिटती का लोचने
सखये या मिलनाला, नुरले काही उणे
हात दे, साथ दे