Rangavi Re Chitrakara Lyrics in Marathi
गुंजते सर्वांग माझे गोड उठती झंकृती
रंगवी रे चित्रकारा हीच माझी आकृती
काजळावाचून डोळे आज दिसती देखणे
गोरट्या या अंगरंगा न्हाऊ घाली चांदणे
अर्पणाच्या ओंजळीला आज लाभे स्विकृती
हीच माझी आकृती !
दाटला रे हर्ष ओठी हळूच वळते हनुवटी
रोमरोमी या शरीरी लाजरीची रोपटी
उमज माझी मज पडेना, स्वप्न की ही जागृती
हीच माझी आकृती !
अंगलटीची ऐट झाली आज काही वेगळी
मधुप पुढती थांबलेला फूल लपवी पाकळी
अधीरले मी मीलनासी परि न करवे ती कृती
हीच माझी आकृती !