Rutlaya ang lyrics in Marathi
गोडी मधाची चाखली
मिटले नयन सरला उजेड
घेतली कवेत लाडकी
माझी सुगरण माझी सुगरण
तिला सजवील तिला भिजवील
रान फुलाची आरास दिलिया आंदन
सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात.
भाळी कुकाच गोंदण
मिटलं व्हटान फुलला मोहोर
घातली सजनानी साद ही
माझी सुगरण माझी सुगरण
मला लाजवील मला भिजवील
रूतलया अंग झालीय दंग
फिरली नजर खुल्या रानात
आभाळाने छत हे धरलया मिठीत
झाकलया यौवन पाण्यात
दिलाया सबुत बांधीन खोपा
झाडाला झोका
धीरा धीरानं चढवीन
रूप नवाळ न्हाऊन
तुला आभाळी फिरवीन
तिला सजवील तिला भिजवील
रान फुलाची आरास दिलिया आंदन
सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात.