Sadhi Bholi Rani Lyrics in Marathi
साधी भोळी राणी, साधा भोळा राजा
लाख मोलाचा ग संसार हा माझा
जणू झोपडीचा राजवाडा होई
हात जोडुनिया सुख उभं राही
दाही दिशा वारा करी गाजावाजा
धरतीची शेज ढगांची वाकाळ
रोज दारी यावी सोन्याची सकाळ
जसा की चाफ्याचा वास ताजाताजा
वेगळं कशाला लेऊ आता लेणं
किती तुला वाहू किती घेऊ दान
पापण्यांनी केला बंद दरवाजा