Sawali unhamadhe lyrics
सावली उन्हामधे ;
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा……
अबोली फुलामध्ये ;
तशी तू माझ्या मनी
मोह बेधुंद तू मनाचा
विखरून चांदरात
काळजात माझियाs
मोहरेs – चेहरा तुझा …
सावली उन्हामधे ;
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचाss
हि साद त्या तारकांचीs
हृदयी नक्षी तुझ्या रुपाची
टपटपतो मनी तुझाच मोगरा
तुझियासाठी होई जीव बावरा
विसरून या जगास आसपास मी तुझ्या
वाटतो आसरा तुझा
सावली उन्हामधे ;
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचाss
झुरतो झुलतो सदा थरारे
जीव हा माझा तुला पुकारे
ये दाटुनी ओथंबूनी
विरही सरही या जीवनी
भिजवून जा जीवनास माझिया
लागूदे … तुझी तृषा
सावली उन्हामधे ;
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचाss