Soniyachya Tati Ujalalya Jyoti Lyrics in Marathi
सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया
माया माहेराची पृथ्वीमोलाची
साक्ष याला बाई चंद्रसूर्याची
कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला
पाठीशी राहु दे छाया रे तशी पाठीशी राहु दे छाया रे
नवलाख दिवे हे निळ्या आभाळी
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी
नक्षत्रांची सर येई भूमिवर
पसरी पदर भेट घ्याया
चंद्र वसुधेला सखा रे भेटला
पाठीशी राहु दे छाया रे तशी पाठीशी राहु दे छाया रे