Sukhache He Nam Lyrics in Marathi
सुखाचें हें नाम आवडीनें गावें
वाचे आळवावें विठोबासी
संसार सुखाचा होईल निर्धार
नामाचा गजर सर्वकाळ
कामक्रोधांचें न चलेचि कांहीं
आशा मनशा पाहीं दूर होती
आवडी धरोनी वाचें ह्मणे हरिहरि
ह्मणतसे महारी चोखियाची
सुखाचें हें नाम आवडीनें गावें
वाचे आळवावें विठोबासी
संसार सुखाचा होईल निर्धार
नामाचा गजर सर्वकाळ
कामक्रोधांचें न चलेचि कांहीं
आशा मनशा पाहीं दूर होती
आवडी धरोनी वाचें ह्मणे हरिहरि
ह्मणतसे महारी चोखियाची