Sukhache He Sukh Shri Lyrics in Marathi
सुखाचें हें सुख श्रीहरि मुख ।
पाहतांही भूक तहान गेली
भेटली भेटली विठाई माउली ।
वासना निवाली जिवांतील
चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा
नामा ह्मणे पाप आणि ताप दुख: गेलें ।
जाहलें हें सुख बोलवेना