Swar Aale Duruni Lyrics in Marathi – स्वर आले दुरुनी

Swar Aale Duruni Lyrics in Marathi – स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वार्‍यांचे, आकाश फिकटल्या तार्‍यांचे
कुजबुज ही नव्हती वेलींची, हितगुज ही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी

विरहार्त मनाचे स्मित सरले, गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले, जखमेतून क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी

पडसाद कसा आला न कळे, अवसेत कधी ना तम उजळे
संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केली कुणी

0watch?v=FUeHKP-82C8

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *