Tirtha Vitthal Kshetra Lyrics in Marathi
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल
माता विठ्ठल पिता विठ्ठल
बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल
गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल
नामा ह्मणे मज विठ्ठल सांपडला
ह्मणोनी कळिकाळां पाड नाहीं