Tu Havishi Lyrics – Online Binline 2015
स्व्पन कि आभास हा
वेड लावी ह्या जिवा
वेगळी दुनिया तरिही ओळखीची
तु हवीशी मला तु हवीशी
आज कळले तुला तु हवीशी
भास सारे कालचे आज ते झाले खरे
तरी का हुर हुर वाटे आपुलीशी
तु हवीशी मला तु हवीशी
आज कळले तुला तु हवीशी
हे नव्याने काय घळले पाउले रेंगाळती
तोच वाऱ्याचा शहारा
श्वास का गंधाळती
सोबतीने चालते भोवताली वाहते
पंख जुळले या मनाचे त्या मनाशी
तु हवीशी मला तु हवीशी
आज कळले तुला तु हवीशी
पाहिले जेव्हा तुला मि पाहताना तु मला
मि तुझी होऊन गेली
विसरली माझी मला
काय जादू सांगना
हरवुनी जाता पुन्हा
कोवळे से ऊन आले सावली शी
तु हवीशी मला तु हवीशी
आज कळले तुला तु हवीशी
भास सारे कालचे आज ते झाले खरे
तरी का हुर हुर वाटे आपुलीशी