Tula Aalavita Jeevan Sarave Lyrics in Marathi तुला आळवीता जीवन सरावे
तुला आळवीता जीवन सरावे
अनंता तुझे रूप नेत्री भरावे
तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती
तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती
तुला अर्पितो ही पुजा भक्तीभावे
तुझ्यावीण अम्हां नसे कोण त्राता
अनाथास तू नाथ, तू विघ्नहर्ता
तुला संकटी मी सदाही स्मरावे
जगन्नायका रे नको अंत पाहू
मना मोही माया, किती काळ साहू
निराकार हे रूप साकार व्हावे