Ugavla Tara Song Lyrics In Marathi
|| गर्जा शिवाजी राजा ||
गिरशी खरी किरीटा परी
लहरी भगवा ध्वजा
उगवला तारा तिमिर हरा
गर्जा शिवाजी राजा || धृ ||
युगा युगाचा गडद अंधार
यौवन चाकरी करी सरदार
मराठा मर्द होऊन खुर्द
छाटल्या शत्रुच्या भुजा
उगवला तारा तिमिरहरा || १ ||
तळपे हाती नंगी तलवार
होऊनी राणा कृष्ण बलस्वार
हर हर करी दरीकपारी
उधळल्या राजाच्या फौजा
उगवला तारा तिमिरहरा || २ ||
भवानी आईचा कृपा वरद
निर्दयी खानाचा करुनी वध
कापुनी यौवना करीत दैना
मातीत मिळविल्या पैजा
उगवला तारा तिमिरहरा || ३ ||
समरधुरंधर दिव्य प्रताप
निती ला घाबरले अनिताप
आश्रम देई संकेत न्याय
अंबेच्या रक्षेला लय
उगवला तारा तिमिरहरा || ४ ||