Unch Majha Zoka Lyrics in Marathi – उंच माझा झोका

Unch Majha Zoka Lyrics in Marathi – उंच माझा झोका

चांदण चाहूल होती कोवळ्या पाऊली
माप मी ओलांडले अन्‌ दूर गेली भातुकली
खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय
सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय
थबकले उंबर्‍यात मी पाहुनी नवी पहाट
जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट
हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत.. झुले उंच माझा झोका !
दाटुनिया येता मेघ भरे आकाश ओंजळ
माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ
झिजे पायरी होऊन जन्म चंदनासारखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत.. झुले उंच माझा झोका !
आरतीत तेवे माझ्या मंद ह्या व्रताची समई
तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई
मीच ओलांडले मला, सोबतीस माझा सखा
येई कवेत आकाश.. झुले उंच माझा झोका !
असे आगळे हे नाते ऐक ही रमा सांगते
बीज हे रुजे अंतरी, जगण्याचे फूल होते
अशा संसार गाण्याला त्याचा-माझा एक ठेका
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत.. झुले उंच माझा झोका !

0cHnshrvVOwc

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *